
मध्य प्रदेशमधील इंदूर येथून हनीमूनसाठी मेघालय येथे गेलेल्या राजा रघुवंशी या नववाविहात तरुणाची पत्नी सोनम हिने कथित प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सोनम हिच्यासह पाच जणांना अटक केली आहे. विशाल सिंह चौहान, आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि राज कुशवाह अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या हत्याकांडाप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून हल्लेखोर राजाचा काटा काढण्यात अयशस्वी ठरले असते तर सोनमने ‘प्लॅन-बी’ तयार ठेवला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाला मारण्यासाठी सोनमने सुपारी दिली होती. यासाठी राज कुशवाह याचेच मित्र मेघालयला पोहोचले होते. मात्र हे हल्लेखोर राजाचा काटा काढण्यात अयशस्वी ठरले असते तर सोनमने दुसरा प्लॅनही तयार ठेवला होता. या हल्ल्यातून राजा वाचला असता तर सोनम त्याला घेऊन उंच कड्यावर जाणार होती आणि सेल्फीच्या बहाण्याने त्याला धक्का देऊन मारणार होती.राजाच्या हत्येनंतर सोनम बेपत्ता झाली होती. 8 जून रोजी तिचा शोध लागला. उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथील नंदगंज पोलीस स्थानकामध्ये तिने आत्मसमर्पण केले. याचवेळी इंदूर आणि सागर शहरात छापे टाकून पोलिसांनी तीन आरोपींनाही अटक केली. त्यानंतर राज कुशवाह यालाही अटक करण्यात आली.
राजाच्या हत्येनंतर सोनम बेपत्ता झाली होती. 8 जून रोजी तिचा शोध लागला. उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथील नंदगंज पोलीस स्थानकामध्ये तिने आत्मसमर्पण केले. याचवेळी इंदूर आणि सागर शहरात छापे टाकून पोलिसांनी तीन आरोपींनाही अटक केली. त्यानंतर राज कुशवाह यालाही अटक करण्यात आली.
दरम्यान, राजा रघुवंशी याचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्याच्या डोक्यात धारधार वस्तूने दोन वेळा वार करण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे, असे पोलीस अधिकारी विवेक सायम यांनी सांगितले.




























































