प्रख्यात संशोधक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक स्वयंसेवकांनी रविवारी दिल्ली येथून चलो पदयात्रेला प्रारंभ केला. लडाखच्या मागण्यांसंदर्भात पेंद्राला थांबलेला संवाद पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यासाठी हे सर्व येथून राष्ट्रीय राजधानीपर्यंत पायी निघाले आहेत. राज्याचा दर्जा, संविधानाच्या सहाव्या अनुसूचीचा विस्तार, लडाखसाठी लोकसेवा आयोगासह भरती प्रक्रिया आणि लेह आणि कारगिल जिह्यांसाठी स्वतंत्र लोकसभेच्या जागा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला आहे. गांधी जयंतीला ही पदयात्रा दिल्लीत पोहोचेल.