सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून डॉक्टरांनी पुढील काही दिवस त्यांना घरी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सोनिया गांधी यांना 2 जूनला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनानंतरच्या गुंतागुंतीमुळे 12 जूनला नाकातून रक्तस्त्र्ााव होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांना 23 जूनला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले आहेत. त्यामुळे त्या चौकशीला हजर राहणार का, याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.