
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. ही बातमी समजताच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी वाड्रा देखील तातडीने रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.
यापूर्वी जानेवारी २०२६ मध्येही सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती, त्यावेळी त्यांना सहा दिवस रुग्णालयात राहावे लागले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तेव्हा त्यांना छातीत संसर्ग आणि ब्रॉन्किअल अस्थमाचा त्रास झाला होता. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.




























































