शहरावर होणार हल्ला, रोखायला आलाय सूर्यवंशी! पाहा धमाकेदार ट्रेलर

1536

अक्षय कुमार अभिनित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिंघम, सिम्बानंतर आता पोलिसांच्या आयुष्यावर दिग्दर्शक रोहित शेट्टी अजून एक चित्रपट घेऊन आला आहे. आणि हा चित्रपट आधीच्यांप्रमाणेच जबरदस्त असेल, असं म्हणायला भरपूर वाव आहे.

सव्वा चार मिनिटांच्या मोठ्या ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेचा अंदाज प्रेक्षकांना घेता येऊ शकतो. मुंबईवर होऊ घातलेल्या दहशतवादी हल्ल्याची कथा या चित्रपटात आहे. अक्षय कुमार यात सूर्यवंशी या पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात झळकणार आहे. त्याला सोबत देण्यासाठी सिम्बा आणि सिंघमही चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाची कथा आणि तिचं सादरीकरण पाहता रोहित शेट्टी पुन्हा एकदा तिकीटबारीवर धमाका करणार असं दिसत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, कतरिना कैफ, जावेद जाफरी, कुमुद मिश्रा अशी कलाकारांची मांदियाळी आहे. विशेष म्हणजे यात जॅकी श्रॉफही एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

पोलिसांच्या आयुष्यावरचे सिंघम, सिम्बा असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीने यंदा त्याच्या सूर्यवंशी या चित्रपटासाठी मात्र गुढी पाडव्याचा मुहूर्त निवडला आहे. सूर्यवंशी हा चित्रपट 2020 मध्ये ईदला प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सलमान खानचे हल्लीचे सगळे चित्रपट ईदला प्रदर्शित होतात. त्यामुळे सलमान खानचे चाहते रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारवर संतापले होते. कारण बॉक्स ऑफीसवर सूर्यवंशी आणि सलमानच्या चित्रपटात संघर्ष झाला असता. पण, रोहितने हा चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित करण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या दिवशी सायंकाळी सहापासून ते पुढे 24 तास या चित्रपटाचे शो ठेवण्यात आले आहेत. हा चित्रपट येत्या 24 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या