टॉपच्या अभिनेत्रीने दिला राम मंदिर निर्माणासाठी निधी, लोकांनाही केले आवाहन

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी देशात निधी संकलनाचे काम सुरू झाले आहे. हे मंदिर याची देही याची डोळा पाहता यावे आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी शेकडो लोक लाखांमध्ये निधी देत आहेत. यात एक नाव दाक्षिणात्य अभिनेत्री प्रनिथा सुभाष (Pranitha Subhash) हिचेही जोडले गेले आहे.

कन्नड, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमधील स्टार अभिनेत्री प्रनिथा सुभाष हिने राम मंदिर निर्माण कार्यासाठी 1 लाख रुपयांचा निधी दिला आहे. प्ननिथा हिने ट्विटर अकाऊंटवर याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने राम मंदिराच्या भव्यदिव्य निर्माणासाठी निधी देण्याचे आवाहन देखील लोकांना केले आहे.

‘नमस्कार, आपल्या सर्वांना माहितीय की अयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माणकार्य सुरू झाले आहे. यासाठी निधी संकलनाचेही काम सुरू आहे. मी देखील राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. जय श्रीराम’, असा व्हिडीओ अभिनेत्री प्रनिथाने शेअर केला आहे.

घरोघर जाऊन निधी मिळवणार

राम मंदिरासाठी निधी संकलनासाठी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते घरोघर जाणार आहेत. देशातील 4 लाख गावांतील 11 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या