लातूरमध्ये लाखो रुपयांचे सोयाबीन चोरीला, गुन्हा दाखल

655

लातूर तालूक्यातील मौजे तांदूळजा येथील लोकमाऊली अग्रो प्रोड्यूसर लि.च्या गोदामातील तब्बल 150 कट्टे सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हास डोलारे लोकमाऊल अ‍ॅग्रो प्रोड्यूसर कंपनीचा अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. तांदूळजा येथे शेतीमाल खरेदी विक्रीचे गोडावून आहे. या गोदामध्ये सुमारे 100 टन सोयाबीन खरेदी करुन ठेवलेले होते. अज्ञात चोरट्यांनी यामधील 150 कट्टे सोयाबीन अंदाजे 9 टन किंमत 364500 रुपयांचे चोरुन नेले. अज्ञात चोरट्यांविरुध्द मुरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या