सुप्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांनाही कोरोनाची लागण, प्रकृती गंभीर

937

सुप्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बालसुब्रमण्यम यांची प्रकृती गंभीर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

एस पी बालसुब्रमण्यम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा खुद्द बालसुब्रमण्यम यांनी एक व्हिडीओ शेअर करत ताप आणि खोकला असल्याचे सांगितले. तसेच आपल्या फॅन्सनी फार काळजी करू नये असे आवाहन केले होते. लवकरच आपण बरे होऊन परत येऊ असे बालसुब्रमण्यम म्हणाले होते. चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण गुरूवारी डॉक्टरांनी एक मेडिकल बुलेटिन जारी केले. त्यानुसार बालसुब्रमण्यम यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.

बालसुब्रमण्यम यांनी तमिळ, तेलुगु, कानडी, हिंदी आणि मल्यासळम सहित 16 भाषांमध्ये 40 हजारहून अधिक गाणी गायीली आहेत. 90 च्या दशकात सलमानच्या चित्रपटात बालसुब्रमण्यम यांचा आवाज असायचाच. बालसुब्रमण्यम यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या