युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत इटलीचा 1-0ने पराभव करत स्पेनने आपले बाद फेरीतले स्थान पक्के केले आहे. या विजयासह स्पेनने ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. स्पेन आणि इटली यांच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात इटलीला रिकार्ड कालाफिओरी याच्याकडून झालेल्या स्वयं गोलचा फटका बसला. हा एकमेव गोल या सामन्यात पहायला मिळला.
स्पेनने सुरुवातीपासूनच सामन्यात आक्रमक पावित्रा घेतला होता. मात्र पहिल्या पुर्वार्धात त्यांना गोल करण्यात अपयश आले. इटलीने केलेला प्रतिकार त्यांना मोडीत काढला आला नाही. पहिल्या हाफमध्ये निको विलियम्सला गोलची चांगली संधी मिळाली होती. मात्र ती हुकली. पहिला हाफ 0-0 अशा बरोबरीत संपला.
दुसऱ्या हाफमध्येदेखील दोन्ही संघांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली होती. मात्र 55व्या मिनिटाला निको विलियम्सच्या क्रॉसवर बॉल रिकार्डोला लागून नेटमध्ये गेला. त्यामुळे स्पेनच्या खात्यात गोल झाला. यानंतर इटलीने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यात अपयश आले. 25 जून रोजी स्पेनचा पुढील सामना अल्बानियाविरुद्ध होणार आहे. तर इटलीचा क्रोएशियाविरुद्ध सामना रंगणार आहे. इटलीने क्रोएशियाविरुद्ध पराभव टाळला तर ‘ब’ गटातून ते स्पेनबरोबर बाद फेरीसाठी पात्र ठरतील.