
शिवसेनेकडून कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सवलतीच्या दरात विशेष एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. यंदाचे हे २३ वे वर्ष असणार आहे. शिवसेना आमदार अरविंद नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरगाव येथून रत्नागिरी, सावंतवाडी व राजापूर या मार्गावर विशेष बससेवा सुरू केली जाणार आहे.
गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या या बसेसच्या तिकिटांचे आरक्षण सोमवार, २७ जुलैपासून सुरू होणार असून कोकणवासीयांनी या सेवेचा लाभघेण्याचे आवाहन शिवसेनेने केले आहे. नोंदणीसाठी : शिवसेना डॉ. भडकमकर मार्ग शाखा, इंपिरियल सिनेमाजवळ, अयोध्या हॉटेलजवळ, गिरगाव. वेळ : सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत.
संपर्क अरविंद नेरकर ९८२११२६८३३, यशराज नेरकर – ९८२०६२६२६३.




























































