परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘खास परीक्षा’ घेणार, केंद्र सरकारचा निर्णय

6123
(फोटो - चंद्रकांत पालकर, पुणे)

अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणारच यावर यूजीसी ठाम असतानाच या परीक्षांना होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन केंद्र सरकारने नवा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव सप्टेंबरमध्ये परीक्षा देणार नाहीत त्यांची नंतर खास परीक्षा घेतली जाणार आहे.

मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज ट्विट करून ही माहिती दिली. ही खास परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन किंवा दोन्ही पद्धतीने घ्यावी, असे आदेश पोखरियाल यांनी देशातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या