
परभणी शहरात संविधान विटंबनेच्या घटनेनंतर उसळलेल्या आंदोलनादरम्यान अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर आज विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली. पुणे सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी काम करणार आहे. परभणीतील एकाही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयाचा या एसआयटीत समावेश नाही.