
सामना ऑनलाईन । मुंबई
गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने मध्यरात्री विशेष उपनगर लोकल सुरू केली आहे. ही कल्याण विशेष लोकल असून १८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसा दरम्यान ही लोकल सुरू राहिल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री दीड वाजता ही लोकल सुटेल व कल्याणला पहाटे तीन वाजता पोहोचले. गणेशोत्सवादरम्यान लोकलमध्ये गर्दी जास्त असल्याने प्रवाशांच्या सुविधेसाठी या लोकलची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे.

























































