गा बाळांनो श्री रामायण; गदिमा, बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षात अनोखी भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  मुंबई

आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि संगीतसूर्य सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या संगीताने अलंकृत झालेले महाकाव्य म्हणजे गीतरामायण. सहा दशके उलटूनही महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यातील रसिकांवर गीतरामायणाची मोहिनी अद्याप ओसरलेली नाही. येत्या रामनवमीला म्हणजे 13 एप्रिल रोजी गीतरामायणाच्या अनोख्या आविष्काराची जादू रसिकांना अनुभवता येणार आहे. चिमुकल्यांचा स्वराविष्कार गा बाळांनो श्री रामायण पहिल्यांदाच मुंबईत सादर होत आहे. 13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता मास्टर दीनानाथ मंगेश नाटय़गृह, विलेपार्ले पूर्व येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.

अथर्व मल्टिक्रिएशनच्या वतीने गा बाळांनो श्री रामायण हा गीतरामायणातील निवडक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गदिमा आणि बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षांत मुंबईत प्रथमच हा कार्यक्रम होत आहे. 7 ते 13 वर्षे वयोगटांतील मुला- मुली या कार्यक्रम सादर करतील. अथर्व कर्णिक, सुरभी पाटील, चिन्मय महाले, भार्गवी करलगीकर, अथर्व देशपांडे, वैदेही परांजपे, रोहन वैद्य, अनुष्का रानडे, श्रावणी वागळे, हर्षवर्धन गोरे, सई सहस्त्र्ाबुद्धे हे बालकलाकार गाणी सादर करतील. कार्यक्रमाची संकल्पना आणि संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे असून निरूपण चंद्रशेखर वझे यांचे आहे. संयोजिका अर्चना विनीत गोरे आणि सोनाली कर्णिक आहेत. हा कार्यकम सर्वांसाठी विनामूल्य आहे.