भरधाव कारवरील नियंञण सुटल्याने शिक्षिकेने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. सातारा ते परळी मार्गावर हा अपघात घडला. गंभीर जखमी जोडप्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अविनाश विकास चव्हाण (30) आणि अश्विनी चव्हाण (27) अशी जखमी जोडप्याची नावे आहेत.
परळी येथील शिक्षिका पुष्पा मोरे या शनिवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर आपल्या कारने सातारा येथे चालल्या होत्या. तर पीडित जोडपे दुचाकीवरून आंबवडे खुर्द गावाकडे चालले होते. याचदरम्यान मोरे यांचे वाहनावरील नियंञण सुटले आणि कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.
मोठा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी जोडप्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. विशेष म्हणजे जोडप्याने चार दिवसापूर्वीच नवीन दुचाकी खरेदी केली होती. पोलीस घटनेचा तपास करत आहे.
अविनाश आणि अश्विनी यांनी अपघाताच्या चार दिवस अगोदर त्यांची दुचाकी खरेदी केली होती. आपल्या नवीन वाहनाची एवढी भीषण टक्कर होईल याचा त्यांना अंदाज आला नव्हता. शनिवारी, सातारा येथील हॉस्पिटलला भेट देऊन परतत असताना, त्यांच्या दुचाकीला एर्टिगाने धडक दिली, परिणामी ते गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या नवीन वाहनाचे मोठे नुकसान झाले.