गाढवांसोबत वेळ घालवा, तणाव दूर करा!

सामना ऑनलाईन। लंडन

गाढवांच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने तणाव दूर होतो व तब्येत सुधारते. हे वाचायला आणि ऐकायला जरी गंमतीशीर वाटत असलं तरी ते सत्य आहे. अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर इंजीनिअरने गाढवांबरोबर वेळ घालवल्याने तणाव दूर होत असल्याचा दावा केला आहे. स्टीव स्टीअर्ट असे त्याचं नाव आहे.

न्यूयॉर्कपासून काही अंतरावर त्याने ‘डाँकी सॅन्चुरी’ नावाचं गाढवांच पार्क सुरू केलयं. त्यात वेगवेगळ्या जातीची गाढवं आहेत. गाढवा साऱखा कष्टाळू, गरीब व विनयशील व आज्ञाशील प्राणी कोणीही नाही. यामुळे त्याच्यात मूळात प्रेमळपणा कुटून भरलेला असतो. तो कधीही कोणावर हल्ला करत नाही. यामुळे अशा निरुपद्रवी प्राण्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे रुग्ण व सामान्य नागरिकांसाठी उत्तम असल्याचं स्टीवचं म्हणणं आहे. सध्या त्याच्या या १.५ एकर परिसरातील पार्कमध्ये ११ गाढव, एक खेचर, व एक झेब्रा आहे. त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी येथे रोज कर्करोगग्रस्त रुग्ण व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने येतात. गाढवांबरोबर वेळ घालवल्याने मानसिक तणाव कमी होतो. ज्याचा परिणाम शऱीरावर होत असल्याचं या रुग्णांच म्हणणं आहे. यामुळे स्टीव यांच्या या गाढवांच्या पार्कमध्ये दुरदुरून पर्यटक येत असतात.

summary…spent time with donkeys and relax