विकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले

5819

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतांना आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत असतानाचे चित्र एकीकडे असतांना दुसरीकडे मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या वसाहतीत राहू देत नसल्याचे उघड झाले आहे. कल्याणच्या तिसगाव येथे एका नर्सला चाळीतील घर सोडून जाण्यासाठी दबाव वाढला असून तिच्यावर बहिष्कार टाकला जात आहे. कहर म्हणजे तिच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार उघड झाला आहे. गेले पाच दिवस हा प्रकार सुरू असून तक्रार करूनही पोलीस मात्र ढिम्म आहेत.

मुळ धुळे जिल्ह्यातील दर्शना बहिरम या नायर रुग्णालयात दीड वर्षे स्टाफ नर्स म्हणून काम करत आहेत. सहा महिण्यापासून त्या तिसगाव येथील एका चाळीत राहत आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्यापासून चाळीत त्यांना रहिवासी त्रास देत आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून त्या सेवा बजावत असताना चाळीत मात्र त्यांचे जगणे अश्या6झाले आहे. आम्हाला कोरोनाची लागण होईल, त्यामुळे तू खोली सोडून जा असा तिच्यामागे तगादा लावला जात आहे. ती ऐकत नसल्याने तिचे चप्पल काठीने फेकणे, अंगावर थुंकणे असा प्रकार केला जात आहे. कोळसेवाडी पोलिसांत याबाबतची तक्रार केली असता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. रहिवाशांना समजावण्यासाठी पोलीस काहीच पावले उचलत नसल्याने दर्शना हवालदिल झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या