मुंबईत आज ‘धावाधाव 55,322 धावपटूंचा सहभाग

162

कडाक्याची थंडी, बोचरी हवा अन् आल्हाददायक वातावरण… याच पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मॅरेथॉन ही प्रतिष्ठsची स्पर्धा रंगणार आहे. जगातील मानाची शर्यत म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा 55,322 धावपटू धाव धाव धावणार आहेत. यावेळी जवळपास तीन कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव विजेत्यांवर करण्यात येणार आहे.

शर्यती सुरू होण्याची वेळ

  • ऍम्यॅचुअर – 5.15 वाजता (सीएसएमटी)
  • हाफ मॅरेथॉन – 5.15 (वरळी डेअरी)
  • 10 के रन – 6.20 (सीएसएमटी)
  • फुल मॅरेथॉन – 7.20 (सीएसएमटी)
  • डिसऑबिलीटी – 7.25 (सीएसएमटी)
  • सीनियर सिटीझन – 7.45 (सीएसएमटी)
  • ड्रीम रन – 8.05 (सीएसएमटी)

ज्योती गवाते ठसा उमटवणार

हिंदुस्थानी गटात महाराष्ट्राच्या ज्योती गवातेला स्पर्धा जिंकून आपला ठसा उमटवण्याची संधी असणार आहे. महिलांच्या फुल मॅरेथॉनमध्ये ज्योती गवाते हिच्यासमोर सुधा सिंगचे आव्हान असणार आहे. तसेच श्यामली सिंग व दिव्यांका चौधरी यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. पुरुषांच्या गटात श्रीनू बुगाता, रशपाल सिंग, राहुल पल यांना मुंबई मॅरेथॉन यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील.

आपली प्रतिक्रिया द्या