बीजिंगमध्ये कोरोनाचा फैलाव, वर्क फ्रॉम होमची ऑर्डर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमधील वुहान शहरातून उद्भवेल्या कोरोनाने जगभरात धुमाकूळ घालत लाखो लोकांचे बळी घेतले. दोन वर्षे लोटली तरी चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. राजधानी बीजिंग शहरात अनेक नवे कोरोनाबाधित आढळल्यामुळे प्रशासनाने कामगार आणि विद्यार्थ्यांनी घरी राहावे, असे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, आज बीजिंगमध्ये कोकिड-19ची प्रकरणे पुन्हा काढल्याने अतिरिक्त सामूहिक कोरोना चाचणीचे आदेश देतानाच वर्क फ्रॉम होमचे विशेष निर्देश जारी केले आहेत.

बीजिंग शहरातील असंख्य निकासी संकुलातून नागरिकांना ये-जा करण्यावर बंदी घातली आहे. आर्थिक केंद्र शांघाय शहराच्या तुलनेत बीजिंगमधील परिस्थिती कमी गंभीर आहे. शांघाय शहरात लाखो नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून केगकेगळ्या लॉकडाऊन निर्बंधांत अडकले आहेत.

  • बीजिंगमध्ये सोमवारी प्रकरणांमध्ये कोरोनाच्या 99 रुग्णांची नोंद झाली. गेले काही दिवस रुग्णांची शहरातील दैनंदिन सरासरी 50च्या आसपास होती.
  • संपूर्ण चीनमध्ये सोमवारी 802 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केवळ छोटय़ा-छोटय़ा स्थानिक पातळीवरील उद्रेकांमुळे रुग्णांची घट होत असल्याचे दिसते.
  • शांघाय शहरातील नोंदीनुसार सुमारे 4,80,000 लोक अजूनही त्यांच्या घरातच बंदिस्त आहेत, तर 1.59 दशलक्ष लोकांना त्यांच्या शेजारच्या परिसरात फिरण्याची परवानगी आहे आणि 21.2 दशलक्ष अल्प निर्बंधाखाली आहेत.