पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेराला गुजरातमधून अटक

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सीमावर्ती भागातील अनेक महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या गुप्तहेराला गुजरातच्या कच्छ येथून अटक केली आहे. सहदेव सिंह गोहिल (28) असे आरोपीचे नाव असून तो आयएसआयच्या संपका&त होता. ऑपरेशन सिंदूरदरम्यान आरोपीने गुजरात सीमेलगतच्या भागात सैन्य तैनात करण्याबाबत पाकिस्तानला बरीच माहिती दिली असावी असा संशय एटीएसला आहे आणि आरोपीची सध्या अधिक चौकशी सुरू आहे. पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या बदल्यात त्याला 40,000 रुपये मिळाल्याची माहिती आहे.