भंडाऱ्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

भंडारा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रकरणात पीडिता मदत मागायला गेल्यावर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार पीडित मुलींनी दिली आहे. भंडारा शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम 354 ए, 509 अन्तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.