श्रीलंका सरकार बुरख्यावर बंदी घालण्याच्या तयारीत

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेची राजधानी कोलंबोत रविवारी झालेल्या साखळी ब़ॉम्बस्फोटात 350 लोकांना जीव गमवावा लागला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या बॉम्बस्फोटात एका महिला दहशतवाद्याचा हात असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे श्रीलंका सरकार आता देशात बुऱख्यावर बंदी घालण्याचा विचार करत आहे.

सदर हल्ल्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसने घेतली आहे. तसेच अमेरिकेच्या मित्रपक्षाला आम्ही टार्गेट करणार असेही इसिसने म्हटले आहे. त्यानंतर या हल्ल्यात एका महिलेचा समावेश असल्याचे समोर आले आहे. सोमवारी य़ा बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत बुरख्यावर बंदी घालण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

ऑस्ट्रिया, बेल्जियम, बुल्गेरिया, कॅमेरून, छाड, डेन्मार्क, फ्रान्स, गॅबॉन, मोरोक्को, चीनमधील काही भागात बुरख्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.