
प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, 2 ऑक्टोबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत मंदिराच्या आतील परिसरात आयोजित करण्यात आला आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावादिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील. सोन्याच्या अलंकारांचा लिलाव व चांदीची नाणी विक्रीसंबंधीचे सर्व अधिकार न्यासाने राखून ठेवलेले आहेत. श्रीसिद्धिविनायकाच्या भक्तांनी या लिलावात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन न्यास व्यवस्थापन समितीने केले आहे.


























































