बेडफोर्डपासून शिवशाहीपर्यंतचा इतिहास सांगत लालपरीची वारी रत्नागिरीत

39

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

1948 ची बेडफोर्ड पासून सुरु झालेला लालपरीचा इतिहास ग्रामीण जनजीवनाशी जोडला गेलाय.ग ड्या आपली एसटीच बरी ही अधिक लोकप्रिय झाली ती एसटीचे ग्रामीण भागाशी असलेल्या अतूट नात्यामुळेच. एसटीच्या 71 वर्षाचा इतिहास वारी लालपरीची या फिरत्या प्रदर्शनातून महाराष्ट्राला पुन्हा अनुभवायला मिळत आहे. वारी लालपरीची गुरुवारी रत्नागिरीत दाखल झाली. आज संपूर्ण दिवस हे प्रदर्शन रहाटाघर बसस्थानकात नागरिकांना पाहायला उपलब्ध झाले आहे.

पहिल्यावहिल्या बेडफोर्ड नंतर मॉरिस कर्मेशियल, अलबियन,टाटा मर्सडीज़ बेन्ज, से लॅण्ड टायगर, एसी कोच, लक्झरी कोच,सिल्पर कोच, एशियाड, सुपर डिलक्स, शिवनेरी, परिवर्तन बस, शिवशाही, विठाई बसपर्यंतचा इतिहास सांगत ही लालपरीची वारी रत्नागिरीत दाखल झाली आहे. रत्नागिरीत रहाटाघर बसस्थानकात वारी लालपरीची फिरते प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, वाहतूक अधीक्षक एस्.एम.खाडे, सहाय्यक अधीक्षक ए.पी.जाधव, आगार व्यवस्थापक वरिष्ठ अजयकुमार मोरे, कनिष्ठ व्यवस्थापक सागर गाडे, कामगार अधिकारी श्री. पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते. फिरत्या बसमध्ये आतापर्यंतच्या बसच्या प्रतिकृती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. एसटीचा इतिहास आणि महामंडळाच्या विविध योजनांची माहिती प्रदर्शनात मांडली आहे. शुक्रवारी 21 जूनला कणकवली आणि 22 जूनला मालवण येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या