एसटीच्या गणेशोत्सवासाठीच्या वाहतुकीला अतिवृष्टीचा फटका

617

गण्शोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी एसटीने जय्यत तयारी केली होती. गणेशोत्सवासाठी कोकणात मुंबई , ठाणे व पालघर या तीन विभागातून 23 बसेस बुधवारी सोडण्यात येणार होत्या. मात्र, मुंबईसह कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणचे रस्ते बंद आहेत. त्याचबरोबरच अतिवृष्टीमुळे या बसेसना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तरीही मुंबई विभागातून दोन आणि ठाणे विभागातून दोन अशा चार बसेस बुधवारी मार्गस्थ करण्याचे नियोजन होते. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे -माणगाव आदी ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक आजच्यासाठी बंद करण्यात आली आहे. गुरुवारी पावसाचा अंदाज घेऊन पुढची वाहतूक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्रीपासून व्यक्तिगत आगाऊ आरक्षणाला सुरूवात झाली आहे. गट आरक्षणासाठी (ग्रुप बुकिंग) संबंधित प्रतिनिधींनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या