भरधाव एसटीची कारला धडक, नागोठण्याजवळ भीषण अपघातात 4 ठार, 3 जखमी

651
accident

नागोठण्याजवळील कोलेटीवाडी येथे आज एसटी बस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांना नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

नागोठणे येथून प्रवासी मारुती कार (एमएच 01/ सीजे 3922) ही मुंबईच्या दिशेने प्रवाशांना घेऊन निघाली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडी गावाच्या हद्दीत कार आली असता समोरून येणाऱ्या एसटी बसने (एमएच 14/ बीटी 4910) कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

या अपघातात संतोष भोनकर (41, रा. धोबीघाट), संतोष साखरकर (42, रा.मानखुर्द), चांदोरकर (40) हे जागीच ठार झाले. तर एकाला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचे नाव समजू शकले नाही. अन्य 3 जखमींना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या