25 वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या एसटी चालकांना मिळणार 25 हजारांचे बक्षीस

ज्या चालकांची 25 वर्षे विना अपघात सेवा झाली आहे, अशा चालकांना यापुढे राज्य स्तरावर सत्कार करून, 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. अशी घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केली. चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो.त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱयाचेही आपण कौतुक करायला पाहिजे, असेही मत मंत्री परब यांनी व्यक्त केले.

सुरक्षित प्रवास हेच प्रमुख ध्येय असलेल्या एसटी महामंडळाने 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान रस्ते सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन सोमवारी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल आगार येथे पार पडले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एसटी महामंडळाची 31 विभागीय कार्यालये व 250 आगारात करण्यात आले होते.

यावेळी एसटी महामंडळात गेली 25 वर्षाहून अधिक काळ विना अपघात सेवा देणारे भारत कोल्हे, कीर्ती पुमार पाटील, परशुराम बंडेकर, सुदेश समुद्रे, महादेव जगधने या मुंबई विभागातील 5 चालकांचा परिवहन मंत्री अॅड. परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, ज्या चालकांनी 25 वर्षं विनाअपघात सेवा दिली आहे त्यांना यापुढे 25 हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या स्तरावर जे प्रयत्न केले जातील.

आपली प्रतिक्रिया द्या