बॉयकॉट, स्ट्रॉस यांना ‘सर’ उपाधी

401

जेफ्री बॉयकॉट व ऍण्ड्रय़ू स्ट्रॉस या इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंना नाइटहूडने सन्मानित करण्यात येणार आहे. सोमवारी या दोघांनाही सरउपाधी देण्यात आली. ब्रिटनचे माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या राजीनामापत्रातील दी ऑनर्स लिस्टमध्ये बॉयकॉट व स्ट्रॉस यांना नाइटहूडने सन्मानित करण्याची घोषणा केली.

स्ट्रॉसने 2004 ते 2012 पर्यंत 100 कसोटी सामन्यांत 7037 धावा फटकावल्या. 2009 2010-11 मधील ऍशेसविजेत्या इंग्लंड संघाचा तो कर्णधार होता. स्ट्रॉस हा माइक गॅटिंगनंतर (1986-87) ऑस्ट्रेलियात ऍशेसमालिका जिंकणारा दुसरा इंग्लिश कर्णधार ठरला. याचबरोबर स्ट्रॉस 2015 ते 2018 पर्यंत इंग्लंड किक्रेटचा डायरेक्टरही होता. 2015च्या विश्वचषक स्पर्धेनंतर इयॉन मार्गनकडे इंग्लंड संघाची धुरा सोपविण्याची कल्पना स्ट्रॉसचीच होती. त्या संघाची मोर्चेबांधणी करून मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने कारकीर्दीतील पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. दुसरीकडे जेफ्री बॉयकॉट हे इंग्लंडचे प्रतिभावान आघाडीचे फलंदाज होते. त्यांनी 1964 ते 1982 पर्यंत 47.72च्या सरासरीने 8,114 धावा केल्या. बॉयकॉट हे थेरेसा यांचे आवडते क्रिकेटपटू होते.

आपली प्रतिक्रिया द्या