राज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण

राज्यात आज 19 हजार 476 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून 21 हजार 29 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 56 हजार 30 वर पोहोचली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.65 टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या 2 लाख 73 हजार 477 रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात 2,360 जणांना कोरोना
मुंबईत आज दिवसभरात 2,360 कोरोना रुग्ण सापडले तर 1,884 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाNयांची संख्या आता 1 लाख 54,088 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 52 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 52 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 601 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 61 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 27 हजार 063 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 10 लाख 35 हजार 440 चाचण्या झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या