राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेला मिळाले हक्काचे कार्यालय

महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे कार्य गेली 40 वर्षे हक्काच्या कार्यालयाशिवाय सुरू होते. पण आता अध्यक्षपदी शररीरसौष्ठव संघटक कमलाकर पाटील यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संघटनेला कळवा, ठाणे येथे हक्काचे कार्यालय मिळाले आहे.

अध्यक्ष पाटील यांनी आपल्या अपोलो जिममध्ये संघटनेला कार्यालयासाठी जागा देत दातृत्वाचा नमुना पेश केला आहे. या कार्यालयाचे उद्घाटन दसऱयाला रविवार, 25 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी दसऱयापासून व्यायामशाळा आणि जिम पुन्हा सुरू करण्यास परवानगी देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खास आभाराचा ठराव राज्य संघटना मंजूर करणार आहे.

महाराष्ट्र राज्य संघटनेचा प्रशासकीय कारभार गेली चार दशके अधिकृत कार्यालयाशिवाय चालला होता. पण गेल्या वर्षी संघटनेच्या अध्यक्षपदी कळवा येथील अपोलो जिमचे संचालक कमलाकर पाटील यांची नियुक्ती होताच त्यांनी कार्यालयाचा प्रश्न सोडवला. आपल्या जिममध्ये संघटनेला विनाशुल्क कार्यालयीन जागा देण्याची घोषणा त्यांनी केली. दसऱया दिवशी राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन व्यायाम प्रशिक्षक गुरुवर्य रमेश चव्हाण जे आपला अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करीत आहेत. कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल बृहन्मुंबई हौशी शरीरसौष्ठव संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या