मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा

प्रातिनिधिक फोटो

राज्यातील मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 4 लाख 83 हजार मच्छीमारांना होणार आहे. शेतकऱ्याप्रमाणे कर्जमाफी, नुकसानभरपाई, विमा असे लाभ आता मच्छिमारांनाही मिळतील. यामध्ये मच्छिमारांना मत्स्यबीज खरेदी, खाद्यखरेदी, एअरकंप तसेच कोल्डस्टोरेज, बर्फ कारखान्याला अनुदान मिळणार आहे.