नवी मुंबईतील बारप्रकरणी चुकीची माहिती दिली ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वयाबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मालकीच्या नवी मुंबईतील बारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

समीर वानखेडे यांनी 1997 मध्ये बार परवान्यासाठी केलेल्या अर्जात त्यांच्या वयाबद्दल चुकीची माहिती दिली होती. वानखेडे यांना 1997 मध्ये त्यांच्या रेस्टो-बारला परवाना देण्यात आला. तेव्हा त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते तर ते मिळवण्यासाठी किमान वय 21 असावे, अशी अट आहे. मात्र, याचे उल्लंघन करण्यात आल्याने ही नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना आठवडाभरात उत्तर देण्यास सांगितले आहे.