मुळेगावात दारू भट्टय़ांवर छापा; सातजणांविरुद्ध गुन्हा

मुळेगाव येथील हातभट्टी दारूभट्टय़ांवर छापा घालून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारूची निर्मिती करणाऱया भट्टय़ांवर दुपारी छापा घातला. यात 12 हजार 900 लिटर रसायन, बॅरल व अन्य साहित्य असा एकूण तीन लाख सहा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. याप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी उपअधीक्षक सदानंद मस्करे, निरीक्षक संभाजी फडतरे, दुय्यम निरीक्षक नांदणी हजारे, उषाकिरण मिसाळ व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.