पुण्यात सावत्र पित्याकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक

बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील कोंढव्यात घडली आहे. सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 37 वर्षीय सावत्र बापाला अटक केली आहे. याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.

आरोपी हा पिडीत अल्पवयीन मुलीचा सावत्र बाप आहे. तो टिंबर मार्केट परिसरात कामाला असून मार्केटयार्ड परिसरात वास्तव्यास आहे. तो अधून-मधून फिर्यादी मुलीच्या घरी येत होता. 16 सप्टेंबर रोजी तो पिडीत मुलीच्या घरी आला होता. मुलगी घरामध्ये झोपली असताना सावत्र पित्याने तिचा विनयभंग केला. यावेळी पिडीत मुलीला जाग आली असता, त्याने तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रसंगावधान राखत सावत्र पित्यास लाथ मारली तेव्हा बाप खोलीतून पळून गेला. झालेल्या प्रकरामुळे पिडीत मुलगी खुप घाबरली होती. दोन दिवसानंतर आपल्या सोबत झालेल्या प्रकाराची माहिती तिने आईला सांगितली. त्यानंतर पोलिसात धाव घेत तिने फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या