अंतराळात तयार होतंय लक्झरी हॉटेल; थिएटर, जीमसारख्या सुविधा मिळणार

भविष्यात तुम्ही सुट्टय़ांमध्ये फिरायला जाण्यासाठी अंतराळात जाण्याचेदेखील प्लॅन आखू शकता. ऐकून आश्चर्य वाटलं ना… पण हे खरंय. एका पंपनीने चक्क अंतराळात लक्झरी हॉटेल बांधण्याची तयारी सुरू केली आहे. 2025 पासून या हॉटेलच्या बांधकामाला सुरुवात होणार असून 2027 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

प्रसिद्ध डिझायनिंग पंपनी ऑर्बिटल असेंब्ली कॉर्पोरेशनने अंतराळात हॉटेल सुरू करण्याची योजना आखली आहे. नुकतंच त्यांनी या हॉटेलच्या डिझाईनचे पह्टो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी तब्बल 400 खोल्यांची सुविधा असणार आहे. कोणत्याही लक्झरी हॉटेलप्रमाणे यात जीम, स्पा, थिएटरसारख्या सुविधा असतील. वोयेजर क्लास स्पेस असे या हॉटेलाचे नाव असणार आहे.

हॉटेलचे बरंचसं बांधकाम पृथ्वीवरच केलं जाणार आहे. हे स्पेस स्टेशन गोलाकार आणि फिरतं असणार आहे. यात चंद्राप्रमाणे गुरुत्वाकर्षण तयार केलं जाईल.

या हॉटेलात अनेक रिंग्ज तयार केल्या जाणार आहेत. त्यातील काही रिंग्ज नासाला रिसर्चसाठी देण्यात येणार आहेत. हॉटेलमधून लोकांना बाहेरचा नजारादेखील पाहायला मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या