मुलीवर अत्याचार; बापाला ठोकल्या बेड्या

दोन वर्षांपासून 13 वर्षांची मुलगी तिच्या सावत्र बापाकडून होणारा लैंगिक छळ सहन करत होती. कोणाला सांगावं, कसं सांगावं या विचाराखाली ती दबली होती, पण अखेर ती व्यक्त झाली. शाळेत समुपदेशन होत असताना तिला बळ मिळाले आणि तिने सावत्र बापाकडून होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. परिणामी तो नराधम गजाआड झाला. 13 वर्षांची ती मुलगी पूर्व उपनगरातील एका शाळेत शिकते.

शाळेत एका स्वयंसेवी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. सुरुवातीला आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत बोलण्यास मुलगी घाबरत होती, पण समुपदेशकांनी विश्वासात घेऊन तिला धीर दिल्यावर मुलगी बोलती झाली. गेल्या दोन वर्षांपासून आई कामावर गेल्यावर सावत्र वडील माझा लैंगिक छळ करीत असल्याचे मुलीने सांगितले.