स्थानीय लोकाधिकार महासंघाचे आज वरळी येथे अधिवेशन

25
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी । मुंबई

भूमिपुत्र मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी अविरत लढा देणाऱया शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार चळवळीला 45 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त लोकाधिकार समिती महासंघाचे एकदिवसीय अधिवेशन आज वरळी येथील वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन या अधिवेशनात लाभणार आहे. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, खासदार गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ आणि सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. महासंघाशी संलग्न असलेल्या विविध समित्यांमधील दहा हजारांवर प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनातील कार्यक्रम
– शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील आणि दिल्लीतील ‘लोकमत’ हिंदीचे संपादक सुरेश भटेवरा यांचे सामाजिक व राजकीय सद्यस्थितीवर भाषण.

– महासंघाच्या 45 वर्षांच्या चळवळीतील मुख्य घटना, आंदोलने, शिबिरे, प्रशिक्षण वर्ग आणि इतिहास कथन करणारी चित्रफीत.

– ‘लोकाधिकार- 45 वर्षे’ या पुस्तकाचे प्रकाशन. नामविस्ताराचा उद्या राज्यभरात रौप्य महोत्सव

आपली प्रतिक्रिया द्या