
स्थानिय लोकाधिकार समिती व भारतीय कामगार सेना, टाटा स्मारक रुग्णालय युनिटच्या वतीने शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या. बालरुग्णांसाठी फळे, खाऊ, ब्लँकेट, चादर व इतर उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, भारतीय कामगार सेना महासंघाचे पदाधिकारी सुनील अहिर, सुनील कोलते तसेच प्रशासनाच्या वतीने टाटा स्मारक पेंद्राचे शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, मुख्य प्रशासकीय अधिकारी (प्रशासन) उमेशकुमार मोते उपस्थित होते. 4 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता युनिटचे अध्यक्ष तुकाराम गवळी, सरचिटणीस नंदकिशोर कासकर, उपाध्यक्ष जगदीश सोळंकी, कार्याध्यक्ष ललित फोंडेकर, खजिनदार नितीन गवळी, राहुल सावंत, नितीन सातपुते, संदीप धामणकर, संतोष शिंदे, मिलिंद नाईक, सतीश पुजारी, नीलेश गायकवाड, प्रताप कोळी, सुधाकर कांबळे, पुष्पा इग्रामपुरकर, राखी बागडे, मंजिरी बागवे, मंजिरी प्रभुलकर, गोमती इब्राहिमपुरकर, कला मकवाना, विजया माने व इतर कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.