दिल्लीत CAA विरोधी आंदोलनात दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात

667

दिल्लीत CAAविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थित जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पोलिसांनी अश्रूधुरांचा मार केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

रविवारी दिल्लीच्या जाफराबादमध्ये महिलांनी CAA विरोधात आंदोलन पुकारले होते. तर दुसरीकडे मौजपूर चौकात अनेक आंदोलकांनी दगडफेक केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजावले. परंतु त्यांनी ऐकल्याने त्यांच्यावर अश्रूधुरांचा मारा करण्यात आला. तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आली. परिस्थिती पाहता पोलिसांनी जाफराबदमध्ये अधिक कुमक मागवली. तसेच अनेक ठिकाणी बड्या पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. सध्या तरी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या