पोलिसांच्या ताब्यातील एका इसमावर कारवाई करू नका, त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत दीडशे जणांच्या आक्रमक जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला. शिंदखेडा पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. जमावाने पोलीस ठाण्याच्या आवारातील शासकीय वाहनांचीदेखील तोडपह्ड केली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी दीडशे संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक भागवत सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विशाल दिलीप सोनवणे यांनी शिंदखेडा पोलिसांत दिलेल्या शिंदखेडा तालुक्यातील वरपाडा येथील जमाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आले. याप्रसंगी दीडशे जणांच्या जमावाने गैरसमजातून पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. जमावाने पोलीस ठाण्यात हजर असलेल्या सुरेश भिवसन रामेश्वर याला आमच्या ताब्यात द्या, पोलिसांनी कारवाई करू नका, असे म्हणत वाद घातला. त्यानंतर जमाव आक्रमक झाला. जमावाने शिंदखेडा पोलीस ठाण्यावरच दगडफेक केली. पोलीस स्टेशनच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय वाहनांच्या काचा पह्डल्या. त्यानंतर संशयित पसार झाले. याप्रकरणी विशाल ठाकरे, महेंद्र सोनवणे, जितेंद्र मालचे, अंबर मोरे, लखन ठाकरे, गोरख मालचे, पैलास पवार यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सात जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.