राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, सहा प्रवासी जखमी

29

सामना ऑनलाईन । गया

बिहार येथील मानपूर जंक्शनवर सियालदह ते नवी दिल्ली जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमुळे गाडीच्या काचा फुटल्या असून ६ प्रवासी जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर ही गाडी गया जंक्शनवर थांबवण्यात आली. गाडीच्या काचा बदलण्यात आल्या आणि जखमी प्रवाशांवर उपचारही करण्यात आले. यानंतर गाडी दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. या दगडफेकीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

गेल्या काही काळापासून रेल्वे प्रवास कष्टाचा ठरताना दिसत आहे. ट्रेनची अनियमितता, प्रचंड उष्णतेमुळे बंद पडणारे एसी यांमुळे प्रवासी वैतागले आहेत. अशाच एखाद्या कारणामुळे ही दगडफेक झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या