
एलपीजी गॅसच्या टंचाईचा सामना करणाऱ्या हिंदुस्थानला आज मोठा दिलासा मिळाला. हिंदुस्थानी जहाजांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय इराणने जाहीर केला. हिंदुस्थानसह चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराक या मित्र राष्ट्रांनाही होर्मुझमधून वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी ही माहिती दिली. होर्मुझ पूर्णपणे बंद नाही. काही देशांसाठी तो खुला असेल, असे आराघची म्हणाले.





























































