
अहिल्यानगरमधील अकोले येथील कुशाबा धांडे, सिंधुदुर्गातील राकाशेठ चव्हाण, रत्नागिरी खेडमधील शिंदेगटाचे संघटक रविंद्र झगडे, पनवेलमधील राजेश मोहिते यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
































































