
पावसाळ्यात कपडे नीट सुकावेत म्हणून काही ट्रिक वापरता येतील. कपडे हाताने धुत असाल तर नीट पिळून घ्या. वॉशिंग मशीनमध्ये हाय स्पीनवर कपडे पिळून घ्या. कपडे सुकवण्यासाठी फॅन आणि एसी हा सर्वात सोपा उपाय आहे.
कपडे थोडेसे ओलसर असताना इस्त्री केल्यास त्यातील उरलेला ओलावा निघून जातो आणि कपडे पूर्णपणे कोरडे होण्यास मदत होते. कपडे टांगताना प्रत्येक कपडय़ाच्या भोवती थोडी मोकळी जागा ठेवा, जेणेकरून हवा सर्व बाजूंनी फिरू शकेल.





























































