उत्तर प्रदेशात विद्यार्थ्याकडून शिक्षिकेलाच मारहाण

उत्तर प्रदेशमध्ये एका विद्यार्थ्याने शिक्षिकेलाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्षिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे.

उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील गांधी सेवा निकेतन या शाळेत ममता दुबे या शिक्षिका आहेत. त्यांना काही विद्यार्थ्यांनी शौचालयात कोंडले. या प्रकरणी दुभे यांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. तेव्हा विद्यार्थ्यांना काय करायचे ते करतील असे उलत उत्तर शाळा प्रशासनाने दिले. दोन दिवसानंतर ममता दुबे पुन्हा शाळेत गेल्या. तेव्हा एका विद्यार्थ्याने त्यांची बॅग फेकून दिली. नंतर त्यांना कानफटात मारून त्यांच्यावर खुर्ची फेकून हल्ला केला.

या प्रकरणी ममता दुबे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या