फीसाठी तगादा लावल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, वसई

शाळेतील शिक्षकाने फी भरण्यासाठी सतत  लावलेल्या तगाद्याला कंटाळून अजय दुबे (वय 14) या विद्यार्थाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वसईमध्ये वालीव पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. करताना अजयने सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यामुळे त्याच्या आत्महत्येचं कारण कळालं आहे.

अजयचे वडील रिक्षा चालवतात, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला फी भरणे शक्य होत नव्हते. शाळेची फी भरण्यासाठी शिक्षकांकडून सतत विचारणा होत होती. एका शिक्षकाने भर वर्गात फी कधी भरणार?, असं विचारलं. जर फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही, असे म्हटले होते. अजयने आपल्याला शाळेत ओरडतात, फी केव्हा भरणार असं वडिलांना विचारलं होतं. यावर लवकरच फी भरू असं त्याचे वडील म्हणाले होते.

आठव्या इयत्तेत शिकणारा अजय अभ्यासात हुशार होता. फी भरता येत नसल्याने त्याला आपलं पुढचं शिक्षण कसं होणार याची काळजी वाटायला लागली होती. त्यातच त्याचा मोबाईल फोन हरवला होता. ही गोष्ट घरी कळालं तर आपली खैर नाही असं अजयला वाटत होतं. सगळ्या गोष्टींचा भयंकर ताण आल्याने त्याने अखेर आत्महत्या केली.