शाळा बंद, मध्यान्ह भोजनही बंद; बिहारचे विद्यार्थी लागले प्लास्टिक गोळा करायला

448

लॉकडाऊनमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये मिळणारे मध्यान्ह भोजनही बंद करण्यात आले आहे. अन्न मिळत नसल्याने अनेक बालकांपुढे दोन वेळच्या खाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. म्हणून आनेक बालक प्लास्टिक गोळा करायला निघाले आहेत.

इंडियन एक्सप्रेसने या बाबत वृत्त दिले आहे. बिहारमधील भागलपूर भागात वस्तीतील अनेक मुले शाळेत जात होते. शाळेत गेल्यामुळे त्यांना मध्यान्ह भोजन मिळत होते. त्यामुळे इथल्या भागातील कुपोषणाचा प्रश्न सुटत होता. आता कोरोना संकट काळात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तसेच शाळाही बंद करण्यात आल्यामुळे या मुलांना मध्यान्ह भोजनही बंद झाले आहे. त्यामुळे अनेक मुलांनी कचर्‍यातून प्लास्टिक वेचण्यास सुरूवात केली आहे. हे प्लास्टिक विकून दिवसाला या मुलांना 10 ते 20 रुपये मिळतात.

मध्यान्ह भोजन जरी नसले तरी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात जमा केल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. पण शासनाकडून कुठलेच पैसे मिळाले नसल्याचे पालकांनी सांगितले आहे. एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की लॉकडाऊन 2 पर्यंत काही पैसे आले होते ते पालकांच्या खात्यात जमा केले होते. नंतर शासनाकडून काहीच पैसे आले नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

या भागात राहणार्‍या महिलेने सांगितले की एक महिन्यापूर्वी सरकारी अधिकार्‍यांनी प्रत्येक कुटुंबाला 5 किलो तांदूळ, गहू आणि डाळ दिली होती. त्यानंतर सरकारने काहीच मदत केली नाही. एक किलो डाळ आणि तांदूळ किती दिवास चालणार असा सवाल या महिलेने विचारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या