कोरोनाबाधित होण्यापूर्वी ‘हा’ आजार झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते…

कोरोनाबाबत सुरू असलेल्या संशोधनातून अनेक बाबी उघड होत आहेत. त्यातील काही गोष्टी आश्चर्यकारक आहेत. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून डेंग्युचा ताप आणि कोरोना व्हायरसमध्ये संबंध असल्याचे संशोधकांना आढळले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात किंवा या वर्षात डेंग्यु झालेल्या व्यक्तींना कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. तसेच कोरोनाचे संक्रमण झाले तरी त्यांच्या शरीरात डेंग्युविरोधात तयार झालेल्या अँटीबॉडी कोरोना व्हायरसविरोधात लढण्याचे काम करतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनावर लवकर मात करणे शक्य होते. यावर अधिक संशोधन झाल्यास डेंग्युच्या औषधांचा वापर कोरोनाबाधितांसाठी करता येऊ शकतो, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

ड्यूक युनव्हर्सिटीतील प्राध्यापक मिगुएल निकोलेलीस यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन करण्यात आले. संशोधनातील निष्कर्षांबाबत सांगताना त्यांनी ब्राझील आणि इतर देशात वर्षभरात डेंग्युची साथ असलेल्या भागाचे उदाहरण दिले आहे. ब्राझीलच्या काही भागात गेल्या वर्षात डेंग्यु मोठ्या प्रमाणात पसरला होता. डेंग्यु पसरलेल्या भागात कोरोनाच्या संक्रमणाचा वेग कमी होता तसेच त्या भागात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. तसेच संशोधनातून कोरोना आणि डेंग्युचा ताप याच संबंध असल्याचे दिसून आले. डेंग्यू फ्लेवीवायरस सेरोटाइप ( SARS-CoV-2) झालेल्यांच्या शरीरातील अँटीबॉडी कोरोना व्हायरसविरोधात काम करत असल्याचे दिसून आले आहे.

डेंग्युविरोधातील अँटीबॉडी शरीरात असलेल्यांना कोरोनाचे संक्रमण होत नाही, असा दावाही निकोलेलीस यांनी केली आहे. मात्र, कोरोना चाचणीत काही कारणांनी या व्यक्ती पॉझिटिव्ह आढळतात, ही आश्चर्यकारक बाबही संशोधनात दिसून आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे एकमेकांपेक्षा वेगळे असलेल्या या दोन व्हायरसमध्ये संबंध दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अधिक संशोधन झाल्यास कोरोनावरील औषध आणि लसनिर्मितीसाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राझीलच्या काही भागात गेल्या वर्षात डेंग्यु झपाट्याने पसरला होता. त्या भागात कोरोना संक्रमणाचा वेग कमी असल्याचे संशोधकांना दिसून आले. अनेकदा संशोधनातील निष्कर्ष आश्चर्यकारक असतात. आपण शोधत असलेल्या गोष्टीपेक्षा वेगळीच गोष्ट समोर येते, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या संशोधनातील निष्कर्षांमुळे कोरोनावरील औषधनिर्मितीसाठी उपयोग होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या