प्रसिद्धीसाठी केला रेल्वे रुळांजवळ स्टंट

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी रेल्वे रुळांजवळ आत्महत्येचा स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जीवघेणे स्टंट करणाऱ्या त्या तरुणाची ओळख पटवण्यात अंधेरी पोलिसांना यश आले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो तरुण पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सोशल मीडियावर अनेक तरुण-तरुणी हे कौटुंबिक, प्रेमाचे तर कधी मनोरंजनाचे व्हिडीओ अपलोड करत असतात, तर व्हिडीओला जास्तीत जास्त व्हय़ुअर मिळावेत म्हणून काही तरुण हे जीवघेण्या स्टंटचे व्हिडीओ बनवतात. जीवघेण्या स्टंटचे व्हिडीओ अपलोड केल्यास जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळेल असे त्या तरुणांना वाटत असते.

आपली प्रतिक्रिया द्या