#AYODHYAVERDICT- अशोक सिंघल यांना भारतरत्न द्या, सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी

1269

विश्व हिंदू परिषदेचे माजी कार्यकारी अध्यक्ष व राम मंदिराच्या निर्माणासाठी झटलेल्या अशोक सिंघल यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. स्वामी यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे.

‘विजयाच्या या प्रसंगी अशोक सिंघल यांची आठवण आली. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लवकरात लवकर त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा करावी. भगवान श्री रामाची इच्छा होती तेव्हाच राम मंदिरातच्या निर्माणाला हिरवा कंदिल मिळाला. जय श्री राम’, असे ट्विट स्वामी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या